माजी नगरसेवक विलास जाधव यांचे फेसबुक अकाउंट हॅक…

बदनामीकारक मेसेज ; पोलिसात तक्रार करणार

⚡सावंतवाडी ता.१९-: येथील शहरातील माजी नगरसेवक विलास जाधव यांचे फेसबुक अकाउंट हॅक करून अज्ञातंकडून त्या अकाउंट वरून बदनामीकारक मजकूर प्रसिद्ध करण्यात येत आहे. दरम्यान याबाबत संबंधिता विरोधात पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करणार असल्याचे जाधव यांनी यावेळी सांगितले.

याबाबतचे अधिक माहिती अशी की माजी नगरसेवक विलास जाधव यांच्या फेसबुक अकाउंट वरून बदनामीकारक पोस्ट येत आहेत, असे त्यांच्या मित्रांकडून त्यांना रात्री फोन करून सांगण्यात आले. त्यानंतर त्यांच्या लक्षात आलं की आपलं फेसबुक अकाउंट कोणीतरी हॅक केले आहे. त्यामुळे त्यांनी सर्वांना आपलं फेसबुक अकाउंट हॅक झाल्याच सांगितल. तसेच आपण अज्ञाता विरोधात तक्रार देणार असल्याचे देखील जाधव यांनी यावेळी सांगितले.

You cannot copy content of this page