घोणसरी येथे 19 पासून हरिनाम सप्ताह…

⚡कणकवली ता.१८-:
घोणसरीचे जागृत देवस्थान श्री देव गणपती मंदिरमध्ये गुरुवार १९ ऑक्टोंबरपासून अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. यानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रम होणार आहेत.

गुरुवारी पाशांकुषा एकादशीला या सप्ताहाला सुरुवात होईल. प्रतिवर्षी हा हरिनाम सप्ताह होत असून त्याला विविध ठिकाणचे भाविक मोठ्या संख्येने दर्शनाला येतात. दररोज विविध भजने सादर होणार असून या मंदिरात जिल्ह्यातील अनेक नामवंत भजनी बुवा भजन सादर करण्यासाठी येतात. बुधवार 25 ऑक्टोंबर रोजी या सप्ताहाचा शेवट होईल. तर गुरुवार 26 ऑक्टोबरला पहाटे काकड आरती, नवस फेड व नवीन नवस बोलणे, दिंडी असा कार्यक्रम होणार आहे. त्यानंतर दुपारी महाप्रसाद होऊन समाप्ती होईल.

You cannot copy content of this page