शेतकरी, सर्वसामान्य जनतेच्या समस्या मार्गी लावणार…

माजी मुख्यमंत्री खा.नारायण राणे यांनी जाणून घेतल्या जनतेच्या समस्या…

*💫कणकवली दि.२४-:* माजी मुख्यमंत्री,भाजपा नेते खासदार नारायण राणे यांनी आज आपल्या समर्पक कार्यलयात जनतेच्या समस्या जाणून घेतल्या. शेतकरी, व्यावसायिक, व्यक्तिगत प्रश्न असणाऱ्या जनतेची गाऱ्हाणी ऐकून घेत खा. नारायण राणे यांनी प्रशासकीय स्थरावर अडकून असलेल्या कामाची सोडवणूक केली.गावो गावच्या जनतेच्या मागण्या जाणून घेत या भेटीत बहुतांश प्रश्न सोडविले.काही प्रश्नचा प्रशासकीय स्थरावर पत्रव्यवहार करण्याचे तर प्रत्यक्ष अधिकाऱ्यांसोबत चर्चा करून प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन खासदार नारायण राणे यांनी भेटी दरम्यान जनतेला दिले. जनतेच्या भेटीत अनेक शेतकऱ्यांनी आपली कैफियत मंडळी काही शेतकऱ्यांना जगली प्राण्यांचा उपद्रव असून परवाना धारक बंदुका असतांना शासनाच्या अतिशर्थी जाच आहेत.अजून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळालेली नाही मात्र त्या शेतीकर्जच्या कर्जवसुली साठी १०१ च्या नोटीसा बजावल्या आहेत त्या बद्दल सुद्धा शेतकऱ्यांनी आपली कैफियत मांडली. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष सौ.समिधा नाईक, उपाध्यक्ष राजेंद्र म्हापसेकर, जिप माजी अध्यक्ष सदस्य सौ.संजना सावंत,माजी उपाध्यक्ष रणजीत देसाई, भाजपा जिल्हाध्यक्ष सौ.संध्या तेरसे, कणकवली तालुका अध्यक्ष संतोष कानडे, वकील सेल चे जिल्हाध्यक्ष राजेश परुळेकर नगरसेवक सौ.प्रतीक्षा सावंत आदी सह पदाधिकारी उपस्थित होते.

You cannot copy content of this page