२२५ हून अधिक जणांनी घेतला लाभ:भाजपाचे माजी
नगरसेवक आप्पा लुडबे मित्रमंडळाच्या वतीने आयोजन..
⚡मालवण ता.१८-: मालवण नगरपरिषद भाजपाचे माजी
नगरसेवक आप्पा लुडबे मित्रमंडळाच्या वतीने भरड – वायरी,
देऊळवाडा परिसरात मोफत रक्त तपासणी, डोळे तपासणी तसेच
आभा कार्ड नोंदणी, आधारकार्ड अपडेट शिबीर आयोजित करण्यात आले. पहिल्या दिवशी सुमारे २२५ हून अधिक जणांनी लाभ घेतला.
भाजपाचे प्रदेश कार्यकारणी सदस्य दत्ता सामंत यांच्यासह भाजपा पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत भरड वायरी परिसरातील नागरिकांसाठी शैलेश लुडबे यांच्या निवासस्थानी आयोजित शिबिराचा शुभारंभ झाला.
१८ ऑक्टोबर रोजी देऊळवाडा नारायण मंदिर नजिक यशवंत गावकर यांच्या निवासस्थानी तर २० ऑक्टोबर रोजी वायरी लुडबेवाडी येथे आप्पा लुडबे यांच्या निवासस्थानी हे शिबीर होणार असून या शिबिरांचा नागरिकांनी मोठ्या संख्येने लाभ घ्यावा, असे आवाहन आप्पा लुडबे यांनी केले आहे.
दरम्यान, वायरी लायब्ररी शाळेजवळ आयोजित शिबिर शुभारंभ प्रसंगी दत्ता सामंत यांच्यासह माजी नगराध्यक्ष सुदेश आचरेकर, माजी नगरसेवक दीपक पाटकर, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष विजय केनवडेकर, आबा हडकर, भाजपा युवा मोर्चा तालुकाध्यक्ष मंदार लुडबे, राजू बिडये, आप्पा लुडबे यांच्यासह शैलेश लुडबे, शफाकत खान, बाबा शेख, संजय पाताडे, दीपक कुडाळकर, ललित तळवडेकर, युसूफ खान, मंथन सुतार, भाई लुडबे, गोविंद गावकर, अतुल हडकर, सागर चव्हाण, तुषार गावकर, कविता तारी आदी स्थानिक नागरिक उपस्थित होते.
