प्रमोद महाजन कौशल्य केंद्रांचे १९ रोजी पंतप्रधानांच्या हस्ते लोकार्पण…

भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांची माहिती..

ओरोस ता.१७-:प्रमोद महाजन ग्रामीण कौशल्य विकास केंद्र ही संकल्पना राज्यातील तरुणांच्या रोजगार संधीसाठी आणि ग्रामीण भागाच्या विकासाला चालना देणारी आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील ग्रामीण भागातील तरुणांच्या रोजगार संधी आणि त्यांना स्वावलंबी करण्याला प्राधान्य दिले आहे. राज्यात ५११ केंद्रे मंजूर करण्यात आली असून सिंधुदुर्ग जिल्ह्यात ८ केंद्रे मंजूर आहेत. यातील ७ केंद्रांचा शुभारंभ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते गुरुवार १९ ऑक्टोंबर २०२३ रोजी सायंकाळी ४ वाजता ऑनलाईन पध्दतीने होणार असल्याची माहिती भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी पत्रकार परिषदेत दिली.

You cannot copy content of this page