ई कचरा व्यवस्थापनामध्ये वेंगुर्ला नगरपरिषदेचा सहभाग

⚡वेंगुर्ला ता.१७-: वेंगुर्ला नगरपरिषदेमार्फत आंतरराष्ट्रीय ई-कचरा दिवसाचे औचित्य साधून १४ ऑक्टोबर रोजी शहरात फिरविलेल्या वाहनामधून गोळा करण्यात आलेला ई-कचरा म्हणजे टीव्हीचे पार्टस, वायर्स, चार्जर, इलेक्ट्राॅनिक वस्तू, खराब झालेले फोन, प्रिटर्स, ट्युब लाईट आदी वस्तू ग्लोबल ई वेस्ट मॅनेजमेंट सिस्टीम, गोवा यांच्याकडे पुढील प्रकियेसाठी सुपूर्द करण्यात आला.

  केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून मान्यता प्राप्त असलेल्या ग्लोबल ई वेस्ट मॅनेजमेंट सिस्टीम, गोवा यांच्याशी वेंगुर्ला नगरपरिषदेचा करार झालेला आहे. त्यानुसार शहरातील ई कचरा जमा करून त्यावर शास्त्रोक्त पद्धतीने प्रक्रिया केली जाणार आहे. १४ ऑक्टोबर रोजी सुमारे ६०० किलो कचरा या सिस्टीमकडे सुपूर्द केला. शहरातील ई-कच-याचे व्यवस्थापन करणारी वेंगुर्ला नगरपरिषद ही जिल्ह्यातील पहिली नगरपरिषद ठरली आहे.
You cannot copy content of this page