बांद्यात ११ नोव्हेंबर रोजी भव्य
नरकासुर स्पर्धेचे आयोजन…

⚡बांदा ता.१७-: दरवर्षी प्रमाणे यंदाही बांदा येथील आमची वाडी देऊळवाडी तर्फे नरक चतुर्दशी निमित्त ११ नोव्हेंबर रोजी भव्य आंतरराज्य नरकासुर स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.

रात्री 8 ते 10 या वेळेत बांदा येथील बांदेश्वर मंदिर येथे हि स्पर्धा संपन्न होणार आहे. नरकासुर स्पर्धे दरम्यान अनेक मनोरंजनाच्या कार्यक्रमांचे देखील आयोजन करण्यात आले आहे. स्पर्धेतील प्रथम पारितोषिक १०,०००, द्वितीय पारितोषिक ५०००, तृतीय पारितोषिक २०००, चतुर्थ व पाचवे पारितोषिक प्रत्येकी १००० रुपये रोख देण्यात येणार आहेत. ही स्पर्धा विनामूल्य असून अधिक माहितीसाठी अक्षय मयेकर (मो. 9503871924) किंवा संकेत वेंगुर्लेकर (मो. 9011107562) यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन स्पर्धेचे संयोजक सागर सावंत यांनी केले आहे.

You cannot copy content of this page