राजकाराणातील रोखठोक व्यक्तिमत्व…

गरिब परिस्थितीतून स्वतःची ओळख निर्माण करणाऱ्या महेश पांचाळ यांना वाढदिवसाच्या ग्लोबल महाराष्ट्र’कडून शुभेच्छां…

⚡सावंतवाडी ता.१६-: कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसताना गरीब परिस्थितीतून स्वतःचे कर्तुत्व निर्माण करणारे महेश पांचाळ यांची राजकीय वाटचाल राजकारणात येऊ पहाणार्‍या युवकांसाठी नक्कीच प्रेरणादायी आहे. समाजाप्रती असलेली कणव, गरीबाप्रती असलेली आस्था, समाजाचे आपण काहीतरी देणं लागतो ही भावना, यातून त्यांनी आपला राजकीय प्रवास सुरू केला. हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराने प्रेरित होऊन त्यांनी समाजकारण व राजकारणात प्रवेश केला.रोखठोक स्वभाव ही त्यांची खासियत. त्यांच्या वाढदिवसानिमित्त ग्लोबल महाराष्ट्र चॅनल कडून घेण्यात आला हा धावता आढावा.

याबाबतची अधिक माहिती आशी की महेश पांचाळ एखाद्या कामात जीव ओतला तर कामाची पूर्तता झाल्याशिवाय मागे हटायचे नाही, असा त्यांचा जिद्दी स्वभाव. यातूनच त्यांनी अनेक युवकांना आपलेसे केले, माणसं जोडली, मने जोडली. याच त्यांच्या मितभाषी स्वभावामुळे नागरिकांचा भरघोस प्रतिसाद त्यांना मिळत आहे. युवकांची एक फळी त्यांनी निर्माण केली आहे.त्याचबरोबर महिला बचत गटाचेही पाठबळ त्यांना मिळाले आहे. आगामी नगरपरिषदेच्या निवडणुकीमध्ये या भागाचे नेतृत्व त्यांनी केल्यास निश्चितच या भागाचा विकास होईल असा आत्मविश्वास प्रभाग क्रमांक सहा म्हणजेच खासकीलवाडा आणि न्यू खासकीलवाडा येथील नागरिकांना वाटत आहे. भारतीय जनता पार्टीचे सक्रिय युवा नेतृत्व असलेले महेश पांचाळ यांचा आज वाढदिवस साजरा होत आहे.त्यानिमित्त त्यांच्या कार्यावर टाकलेला प्रकाशझोत

सावंतवाडी शहरातील धडाडीचा युवा कार्यकर्ता म्हणून महेश अनंत पांचाळ हे नाव सर्वपरिचित आहे. विद्यार्थिदशेपासून ते समाजकारणात असून 1998 मध्ये त्यांचा राजकारणात प्रवेश झाला. महाविद्यालयीन जीवनात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेच्या भारतीय विद्यार्थी सेनेचे कॉलेज प्रमुख म्हणून त्यांनी खर्‍या अर्थाने आपल्या राजकीय जीवनाची सुरुवात केली. हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचे पाईक असल्याने महेश पांचाळ हे आजही 80 टक्के समाजकारण व 20 टक्के राजकारण या तत्वाने काम करत आहेत. 2007 मध्ये भारतीय विद्यार्थी सेनेचे उपजिल्हाधिकारी या पदावर त्यांना नियुक्त करण्यात आले. पुढे सन 2013 मध्ये त्यांची सावंतवाडी शिवसेनाशहर प्रमुख म्हणून निवड करण्यात आली. त्यावेळी स्व. शैलेश तावडे हे शिवसेनेचे सावंतवाडी तालुकाप्रमुख होते. त्यांच्यासोबत असलेले शिवसेनेचे पदाधिकारी विलास सावंत या दोघांची समर्थ साथ मिळाल्यामुळे शिवसेनेमध्ये त्यांनी जोमाने काम सुरु केले. त्यांच्या कामाचा आवाका व गती पाहून त्यांना 2014 साली उपतालुकाप्रमुख पदावर बढती मिळाली. मात्र 2017 मध्ये पदाधिकार्‍यांशी झालेल्या मतभेदांमुळे त्यांनी शिवसेना पक्ष सोडला आणि 2018 मध्ये त्यांनी भारतीय जनता पार्टी पक्षामध्ये प्रवेश केला. एक धडाडीचा कार्यकर्ता म्हणून त्यांच्या कार्यपद्धतीची दखल घेत, भाजपा पक्ष श्रेष्ठींनी त्यांना सावंतवाडी तालुका भाजपा सरचिटणीसपदी नियुक्त केले. त्यांच्या वाढदिवसानिमित्त ग्लोबल महाराष्ट्र चॅनल कडून त्यांना खूप खूप शुभेच्छा.

You cannot copy content of this page