जिल्हास्तरीय ८०० मीटर धावणे स्पर्धेत रेश्मा पांढरे प्रथम…

⚡मालवण ता.१६-: क्रीडा व युवा संचलनालय,पुणे आणि जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय सिंधुदुर्ग तर्फे क्रीडा संकुल ओरोस येथे संपन्न झालेल्या जिल्हा स्तरीय शालेय मैदानी क्रीडा स्पर्धांमध्ये मालवण येथील स.का.पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालय संलग्न रामभाऊ परुळेकर कनिष्ठ महाविद्यालयाच्या कु.रेश्मा रावबा पांढरे हिने ८०० मीटर धावणे क्रीडा प्रकारात प्रथम क्रमांक पटकावला. यामुळे तिची सांगली येथे होणाऱ्या विभागस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.

या यशाबद्दल रेश्मा पांढरे हिचा महाविद्यालयाच्या वतीने प्रभारी प्राचार्य कैलास राबते यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी कनिष्ठ महाविद्यालय समन्वयक व क्रीडा मार्गदर्शक प्रा.हसन खान, प्रा. मिलन सामंत, प्रा. अन्वेशा कदम, प्रा. हर्षदा धामापूरकर, प्रा. स्नेहा बर्वे, प्रा.डॉ.हंबीरराव चौगले,प्रा.डॉ.एम.आर.खोत व विद्यार्थी उपस्थित होते. कृ.सी.देसाई शिक्षण मंडळाचे कार्याध्यक्ष बाळासाहेब पंतवालावलकर व शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष साईनाथ चव्हाण यांनीही रेश्मा पांढरे व इतर यशस्वी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.

You cannot copy content of this page