कृषी महाविद्यालय किर्लोसच्या कृषीदुतांचे कुक्कुटपालन व्यवसाय व्यवस्थापन प्रशिक्षण

⚡कणकवली ता.१६-: ग्रामीण कृषी कार्यानुभव 2023-24 अंतर्गत छत्रपती शिवाजी कृषी महाविद्यालय किर्लोसच्या कृषीदुतांचे आवळेगाव येथील प्रशालेत कुक्कुटपालन व्यवसाय व्यवस्थापन प्रशिक्षण व मोफत लसीकरण कार्यक्रमाचे आयोजन केले
या कार्यक्रम प्रसंगी कृषी विज्ञान केंद्र किर्लोस चे शास्त्रज्ञ डॉ. के. व्ही.देसाई यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले.या कार्यक्रमावेळी शेतकऱ्यांना कुक्कुटपालन व्यवसाय व्यवस्थापनाबद्दल माहिती देण्यात आली. याप्रसंगी आवळे गावचे उपसरपंच विवेक कुपेरकर प्रशालेच्या मुख्याध्यापिका ठाकूर व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे औचित्य साधून गावातील 300 कोंबड्यांना लासोटा व रानीखेत या लसीचे मोफत लसीकरण करण्यात आले. त्यामुळे कोंबड्यांमध्ये रोगांचे प्रादुर्भाव होत नाही. व या लसी आजारावर उपायकारक आहे. हा कार्यक्रम छत्रपती शिवाजी कृषी महाविद्यालय ओरोस येथील कृषिदूत संगम सावंत, ऋषिकेश तासे, विक्रांत करे व साहिल पाठक तसेच कृषी विज्ञान केंद्र किर्लोस यांच्या संयुक्त प्रयत्नाने यशस्वी झाला.

You cannot copy content of this page