⚡सावंतवाडी ता.१४-: येथील मिलाग्रीस मराठी प्रायमरी स्कूल या प्रशालेत टाकाऊ पासून टिकाऊ वस्तूंचे कार्यानुभव साहित्य प्रदर्शन मोठ्या उत्साहात पार पडले. याप्रसंगी इयत्ता पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांनी विविध प्रकारचे साहित्य बनवून आपले कौशल्य दाखवले. टाकाऊ वस्तु पासून टिकाऊ वस्तू बनवता येतात हा संदेश या प्रदर्शनामार्फत विद्यार्थ्यांनी सर्वांना दिला.
सदर प्रदर्शनाचे उद्घाटन श्रीम.श्रद्धा दत्ताराम कर्पे यांनी केले. या प्रसंगी प्रशालेच्या मुख्याध्यापिका सि. कविता चांदी यांनी मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. प्रशालेचे सर्व शिक्षक यावेळी उपस्थित होते.
विद्यार्थ्यानी बनविलेल्या सुंदर, मनमोहक अश्या वस्तू प्रदर्शनात पाहायला मिळाल्या. या प्रदर्शनातून विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यात आला.
याप्रसंगी प्रमुख पाहुणे यांनी आपले विचार मांडले. प्रशालेच्या मुख्याध्यापिका सि. कविता चांदी यांनी ही आपले मनोगत व्यक्त केले. अश्याप्रकारे सर्वांच्या उपस्थिती प्रदर्शन सोहळा पार पडला.
