राष्ट्रवादीच्या फुटीचा सिंधुदुर्ग जिल्ह्यावर काही परिणाम नाही…

बाळासाहेब पाटील: प्रशासनावर सरकारचा अंकुश नाही…

⚡सावंतवाडी ता.१३-: राज्यात राष्ट्रवादीत फूट पडली असली तरी सिंधुदुर्ग जिल्ह्यात त्याचा काही परिणाम झाला नाही आशी माहिती राज्याचे मंत्री तथा राष्ट्रवादीचे रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदार संघाचे निरीक्षक बाळासाहेब पाटील यांनी आज येथे दिली.

दरम्यान स्थानिक निवडणुका होत नसल्याने राज्यात प्रशासनावर कोणाचा अंकुश राहला नसल्यामुळे अधिकाऱ्यांचा मनमानी कारभार सुरू असल्याचा आरोप देखील बाळासाहेब पाटील यांनि यावेळी केला आहे.ते आज सावंतवाडी पदाधिकाऱ्यांच्या सभा निमित्त आले असताना ते पत्रकारांशी बोलत होते.

यावेळी माजी राज्यमंत्री प्रवीण भोसले जिल्हाध्यक्ष अमित सामंत सावंतवाडी विधानसभा अध्यक्ष अर्चना घरी परब, आनंद पिळणकर,प्रसाद रेगे आदी उपस्थित होते.

You cannot copy content of this page