शिक्षणाधिकारी कुडाळकर यांनी इन्सुली शाळा नंबर ५ चे केले कौतुक…

नुकतीच भेट देत राबविलेल्या उपक्रमाची केली पाहणी

बांदा/प्रतिनिधी
इन्सुली येथील जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा नंबर ५ ला प्राथमिकशिक्षणाधिकारी प्रदीपकुमार कुडाळकर, उपशिक्षणाधिकारी शोभराज शेर्लेकर यांनी सदिच्छा भेट दिली. यावेळी शाळेने राबविलेल्या विद्यार्थिभीमुख विविध उपक्रमांचे कौतुक श्री कुडाळकर यांनी केले.
शाळेतील इयत्ता पाचवी पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्तीधारक विद्यार्थिनी रिद्धी सावंत हिचे तसेच मार्गदर्शक सुधीर गावडे, मुख्याध्यापक धनंजय केरकर, भास्कर माजगावकर व हंसराज गवळे यांचे अभिनंदन केले तसेच शाळा व विद्यार्थी सरल व आधार अपडेटशन केल्याबद्दल मुख्याध्यापक श्री. केरकर व सर्व शिक्षकांचे देखील अभिनंदन केले. यावेळी त्यांनी परसबागेची पाहणी केली. येथील विद्यार्थ्यांची शिस्त याबद्दल देखील कौतुक केले.

You cannot copy content of this page