आगामी निवडणुका जिंकण्यासाठी विधानसभा मतदारसंघात १०८ ते ११० सुपर वॉरियर्स नियुक्त…

अतुल काळसेकर:प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे १९ रोजी जिल्हा दौऱ्यावर…

⚡सावंतवाडी ता.०९-: आगामी निवडणुका जिंकण्यासाठी विधानसभा मतदारसंघात १०८ ते ११० सुपर वॉरियर्स नियुक्त करण्यात आले आहेत. असून महाविजय संकल्प २०२४ साठी भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे कोकण दौऱ्यावर येत आहेत १९ ऑक्टोबरला ते कणकवली येथे कार्यकर्त्यांची संवाद साधतील अशी माहिती भारतीय जनता पार्टीचे सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष अतुल काळसेकर यांनी दिली. सावंतवाडी येथे झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते

यावेळी जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत माजी जिल्हाध्यक्ष राजन तेली जिल्हा सरचिटणीस महेश सारंग जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी एकनाथ नाडकर्णी माजी नगराध्यक्ष संजू परब राजन म्हापसेकर श्वेता कोरगावकर रवींद्र मडगावकर महेश धुरी प्रथमेश तेली अजय गोंदावळे दिलीप भालेकर प्रमोद कामत आदी उपस्थित होते

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नऊ वर्षाच्या कार्यकाळातील विविध योजना विकास कामे तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे राज्यातील कामगिरी सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्याकरिता भाजपा प्रदेशाध्यक्ष बावनकुळे हे १७ ऑक्टोबर पासून कोकण दौऱ्यावर येत आहेत ते सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली आणि सावंतवाडी विधानसभा मतदारसंघासाठी १९ ऑक्टोबरला सायंकाळी तीन वाजता कणकवली येथे कार्यकर्त्यांची संवाद साधतील महाविकास संकल्प 2024 या अभियानात प्रत्येक घरोघर वारियर्स जाऊन मातीचा कलशामध्ये तीनशे आठ ठिकाणाहून माती गोळा करून कणकवलीत जमा करून ती दिल्ली येथील पाठवण्यात येणार आहे दिल्ली या ठिकाणी शहिदांच्या
स्मारकातील अमृतवाटिकेला ही माती प्रदान केले जाणार असल्याचे काळसेकर यांनी सांगितले

You cannot copy content of this page