प्रमोद जठार ; कुडाळ येथील कार्यक्रमात दिल्या शुभेच्छा..
⚡कुडाळ त.०९-: राणे कुटुंबीयांच्या संगतीत राहिलेला व्यक्ती भविष्यात आमदारच काय तर खासदारही होऊ शकतो. त्यामुळे कोणी कोणाच्या संगतीत रहावे हे प्रत्येकाने ओळखणे गरजेचे आहे.
विशाल परब यांनी हे वेळीच ओळखल्याने ते आज राणे कुटुंबियांच्या संगतीत आहेत. त्यामुळे विशाल परब यांचे भविष्य एका वेगळ्या उंचीवर असणार यात दुमत नाही. विशाल तुझे भविष्य उत्तुंग आहे अशा शब्दात भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष तथा नेते प्रमोद जठार यांनी विशाल परब यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या. ते कुडाळ येथील विशाल अभिष्टचिंतन सोहळ्याच्या शुभारंभ कार्यक्रमात बोलत होते.
