माझे साहेब निलेश राणे आमदार होईल तेव्हा माझी घौडदौड दुप्पटीने सुरु होईल …

विशाल परब यांचे स्पष्टीकरण; भविष्यात यापेक्षाही चांगले कार्यक्रम घेऊ..

⚡कुडाळ ता.०९-: जिल्ह्यात विशाल परब यांच्या कार्यक्रमाची नेहमीच चर्चा असते लोक काय चर्चा करतात हे मला माहीत नाही. परंतू मी एकच सांगू इच्छीतो की, माझ्या नशिबामध्ये काय घडायचे ते घडूदे पण जेव्हा माझे साहेब निलेश राणे आमदार होईल त्या दिवसापासून अधिक दुप्पटीने ताकदीने माझी घौडदौड सुरू होईल असे स्पष्टीकरण भाजप युवा नेते तथा उद्योजक विशाल परब यांनी आज येथे व्यक्त केले.
तर प्रसिद्ध कीर्तनकार इंदुरीकर महाराज यांना सिंधुदुर्गात आणण्यामागे येथील तरुण युवा वर्ग भरकटला जाऊ नये, त्यांचे विचार आजार युवकांना लाभले तर युवकांना चांगली प्रेरणा मिळू शकते हाच उद्देश आहे.
श्री परब यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त आयोजित केलेल्या विशाल अभिष्टचिंतन सोहळ्याच्या शुभारंभ प्रसंगी आयोजित कार्यक्रमात ते व्यासपीठावरून बोलत होते.

You cannot copy content of this page