आंजिवडे येथील पंदारे कुटुंबीयांना मंत्री दीपक केसरकर यांच्याकडून आर्थिक मदत सुपूर्द…

⚡कुडाळ ता.०८-: सावंतवाडी येथे गणेश चतुर्थीच्या काळात भजन आटपून घरी जात असताना राजवाड्यासमोरील भेडल्या माडाचे झाड अंगावर पडून कुडाळ तालुक्यातील आंजिवडे येथील दोघा तरुणाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली होती. यामुळे पंदारे कुटुंबियांवर मोठे संकट कोसळले.


शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांच्या माध्यमातून देण्यात आलेली प्रत्येकी एक-एक लाखाची आर्थिक मदत काल पंदारे कुटुंबियांच्या घरी जाऊन त्यांना सुपूर्द करण्यात आली. यावेळी शिवसेना पक्षाच्या वतीने कुडाळ तालुकाप्रमुख योगेश तुळसकर, महिला तालुकाप्रमुख सिद्धी शिरसाट, रामकृष्ण गडकरी, पुंडलिक जोशी, आबा केसरकर, राजन पोकळे, कारिवडे शाखाप्रमुख लक्ष्मण भालेकर आदी शिवसैनिक उपस्थित होते.

You cannot copy content of this page