जिल्हास्तरीय बास्केटबॉल स्पर्धेत १७ वर्षाखालील गटात जय गणेश इंग्लिश मीडियम स्कूल विजयी

मालवण (प्रतिनिधी)

मालवण एज्युकेशन सोसायटी संचलित मालवण येथील जय गणेश इंग्लिश मीडियम स्कूलच्या मैदानावर पार पडलेल्या जिल्हास्तरीय बास्केटबॉल स्पर्धेत १७ वर्षाखालील गटात जय गणेश इंग्लिश मिडीयम स्कुलच्या संघाने विजेतेपद पटकाविले.

या स्पर्धेचे उद्घाटन मालवण एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष शरद परुळेकर यांच्या हस्ते झाले. दोन दिवस चाललेल्या स्पर्धेमध्ये १४ वर्षाखालील मुलांच्या गटात टोपीवाला हायस्कूल विजयी तसेच मुलींच्या गटात गणेश इंग्लिश मीडियम स्कूल विजयी. १७ वर्षे गटात मुली आणि मुलगे गटात जय गणेश इंग्लिश मीडियम स्कूल विजयी झाले. तर १९ वर्षे गटामध्ये टोपीवाला ज्युनिअर कॉलेजचे दोन्ही संघ विजयी ठरले. विजयी सर्व संघांची विभागीय स्पर्धेसाठी निवड झाली असून ते सिंधुदुर्ग जिल्ह्याचे नेतृत्व करणार आहेत. विजयी सर्व संघांचे मालवण एज्युकेशन सोसायटी तसेच जय गणेश इंग्लिश मीडियम स्कूल मुख्याध्यापिका शिक्षक आणि पालक यांनी अभिनंदन केले.

You cannot copy content of this page