बांदा निमजगा सार्वजनिक नवरात्रौत्सव मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी घेतली विशाल परब यांची भेट…

नवरात्रौत्सवाला केले निमंत्रित; विशाल परब यांनी दिले सहकार्याचे आश्वासन..

⚡सावंतवाडी ता.०८-: बांदा निमजगा येथील सार्वजनिक नवरात्रोत्सव सांस्कृतिक कला क्रीडा मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी भाजपाचे युवा नेतृत्व तथा उद्योजक विशाल परब यांची भेट घेत नवरात्रोत्सवाला निमंत्रित केले आहे. श्री परब हे गेली कित्येक वर्ष सामाजिक क्षेत्रात कार्यरत असून सामाजिक बांधिलकी जपत आले आहेत.

वेळोवेळी त्यांनी सामाजिक उपक्रम राबवणाऱ्या मंडळांना आर्थिक सहकार्य ही केले आहे अडीअडचणीत धावून येणारे नेतृत्व म्हणून श्री परब यांच्याकडे पाहिले जाते याच दृष्टिकोनातून बांदा निमजगा येथील सार्वजनिक नवरात्रौत्सव सांस्कृतिक कला क्रीडा मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी आज श्री परब यांची सावंतवाडी येथील त्यांच्या कार्यालयात भेट घेत नवरात्रौत्सवाला निमंत्रित केले.

You cannot copy content of this page