युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांनी उचलली जबाबदारी…
⚡कणकवली ता.०८-: कणकवली शहरातील गाडादेवी मंदिर हे शहरातील पुरातन मंदिर आहे. या मंदिराची डागडुजी करायचा विचार भक्तगणांच्या मनात होता.याची जबाबदारी कणकवली नगरपंचायत माजी नगरसेवक तथा युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांनी उचलून मंदिराची लादी बसून देण्याचा शब्द ग्रामस्थांना दिला.
या गाडादेवी मंदिराचा परिसर नगरसेवक सुशांत नाईक यांच्या प्रभागात येतो. या ठिकाणी युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांनी स्वखर्चातुन लादी बसवून देण्याचे काम सुरू करण्यात आले.गाडादेवीच्या भक्तगणांनी सुशांत नाईक यांचे आभार ही मानले.यावेळी गावपुरुष सदानंद उर्फ बाळा राणे, गावपुरुष मंगेश राणे,गावपुरुष अंबाजी राणे, ग्रामस्थ संजय घाडी, दिपक परब, दत्ता साटम. मुरलीधर नाईक, अनिल नाईक, सुशांत नाईक, आदी उपस्थित होते.
