विद्यामंदिर कणकवलीचे जिल्हास्तरीय बॉल बॅडमिंटन स्पर्धेत चारही संघ प्रथम…

⚡कणकवली ता.०८-: क्रीडा व युवक सेवा संचालनालय,पुणे व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय,सिंधुदुर्ग यांच्या वतीने आयोजित जिल्हास्तरीय शालेय बॉल बॅडमिंटन स्पर्धेत 14 वर्षाखालील मुली-प्रथम क्रमांक, मुलगे-प्रथम क्रमांक,
17 वर्षाखालील मुली-प्रथम क्रमांक ,मुलगे-प्रथम क्रमांक पटकावून जिल्हास्तरीय स्पर्धेत वर्चस्व प्राप्त केले आहे. सदर चारही संघाची कोल्हापूर विभागीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
या विद्यार्थ्यांना क्रीडा शिक्षक अच्युतराव वनवे व सुदिन पेडणेकर यांचे मार्गदर्शन लाभले आहे.वरील सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेच्या चेअरमन डॉ.राजश्री साळुंखे, सचिव विजयकुमार वळंजू, अध्यक्ष दत्तात्रय तवटे, ट्रस्टी अनिलपंत डेगवेकर, प्रशालेचे मुख्याध्यापक पी.जे.कांबळे,पर्यवेक्षिकासौ.जाधव व्ही.बी. व सर्व शिक्षकवृंदांनी अभिनंदन केले आहे.

You cannot copy content of this page