*💫बांदा दि.०९-:* बांदा येथील स्वयंभू श्री बांदेश्वर मंदिरात बुधवार १० ते १४ मार्च दरम्यान महाशिवरात्री उत्सव साजरा होत आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासन नियमांचे तंतोतंत पालन करुन सोहळा साजरा होणार आहे. उत्सवाची सुरुवात बुधवार १० रोजी रात्री ९ वाजता पालखी प्रदक्षिणाने होणार आहे. गुरूवार ११ रोजी सकाळी सूर्योदयापासून दुसर्या दिवशी सुर्योदयापर्यंत अष्टोप्रहर रुद्रावर्तन व अभिषेक होईल. सकाळी ८ ते दुपारी ३ पर्यंत शिवलीलामृत ग्रंथ पारायण, सायंकाळी ३.३० पासून विविध भजन मंडळांची भजने, रात्री ९ वा. श्रींची मंदिराभोवती सवाद्य पालखी प्रदक्षिणा होईल. शुक्रवार १२ रोजी सायंकाळी ५ वा. श्री बांदेश्वर मंदिर ते देव पाटेश्वर मंदिर दरम्यान सवाद्य पालखी मिरवणूक होईल. रविवार १४ रोजी दुपारी १ वा. समाराधनाने उत्सवाची सांगता होणार आहे. भक्तगणांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कोविडचे सर्व नियम पाळून उत्सवाचा लाभ घेण्याचे आवाहन श्री देव बांदेश्वर स्थानिक सल्लागार समितीच्या वतीने करण्यात आले आहे.
बांदेश्वर मंदिरात उद्यापासून महाशिवरात्री उत्सवाला प्रारंभ….
