⚡सावंतवाडी ता.०५-: मळगाव येथील युवकाला 38 हजार रुपयाला ऑनलाइन गंडा घालण्यात आला.बुधवारी ही घटना घडली. गुरूवारी युवकाने सायबर क्राईमकडे तक्रार दिली. ऋतिक प्रकाश तळकटकर असे गंडा घालण्यात आलेल्या युवकाचे नाव आहे.
तो मळगाव मध्ये सायबर कॅफे चालवलो होतो बुधवारी त्याचे गुगल पे ओपन होत नव्हते गुरुवारी गुगल पे ओपन झाल्यानंतर त्याच्या एसबीआय बँकेत असलेल्या अकाउंट मधून 38 हजार रुपये काढण्यात आल्याचे लक्षात आले. नऊ वेळा ही रक्कम काढण्यात आली त्याने सावंतवाडी पोलीस ठाण्यात धाव घेतली मात्र सायबर गुन्हा असल्यामुळे युवकाला सायबर क्राईम कडे तक्रार देण्यास सांगितले आहे त्यानुसार सायबर क्राईम कडे त्यांने तक्रार दिली आहे
