वैभववाडी येथे शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाच्यावतीने 6 रचजी होऊदे चर्चा कार्यक्रम…

⚡वैभववाडी ता.०५ संजय शेळके-: वैभववाडी येथे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्यावतीने शुक्रवार दिनांक 6 ऑक्टोबर 2023 सकाळी ठीक 11 वाजता होऊदे चर्चा विचारा प्रश्न अभियानाची कॉर्नर सभा संभाजी चौक वैभववाडी येथे संपन्न होणार आहे.
सदर सभेला शिवसेना सचिव तथा खासदार विनायक राऊत, अभियानाचे निरीक्षक शिवसेना नेते गुरुनाथ खोत, उपनेते तथा जिल्हा संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर, उपनेते गौरीशंकर खोत, महिला आघाडीच्या उपनेत्या श्रीमती मीनाताई कांबळे, जिल्हा समन्वयक प्रदीप बोरकर, आमदार वैभव नाईक, जिल्हाप्रमुख संदेश पारकर, कणकवली देवगड विधानसभा प्रमुख सतीश सावंत, जिल्हा संपर्कप्रमुख अतुल रावराणे, युवा सेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक, महिला जिल्हा संघटक नीलम पालव, उपजिल्हाप्रमुख नंदू शिंदे, जिल्हा कार्यकारी सदस्य संदीप सरवणकर, हे उपस्थित राहणार आहेत. तरी शिवसेना युवासेना व महिला आघाडीच्या सर्व पदाधिकारी आजी-माजी लोकप्रतिनिधी जि प सदस्य पसं सदस्य सरपंच व तथा शिवसैनिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आव्हान वैभववाडी तालुका प्रमुख मंगेश लोके युवा सेना जिल्हा सरचिटणीस स्वप्निल धुरी शहर प्रमुख शिवाजी राणे यांनी केले आहे.

You cannot copy content of this page