कणकवलीत 6 रोजी अभियान
⚡कणकवली ता.०६-: शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार शिवसेना कणकवली तालुक्याच्या वतीने शुक्रवार ६ ऑक्टोबर २०२३ रोजी सायंकाळी ५.३० वाजता “होऊ दे चर्चा विचारा प्रश्न..!” हे अभियान राबविण्यात येणार आहे. यानिमित्त कणकवली तालुक्यात कॉर्नर सभा घेण्यात येणार आहेत.
यावेळी शिवसेना सचिव खा. विनायक राऊत,अभियानाचे निरीक्षक शिवसेना नेते गुरुनाथ खोत, उपनेते जिल्हा संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर, उपनेते गौरीशंकर खोत, महिला आघाडीच्या उपनेत्या श्रीमती मीनाताई कांबळी ,जिल्हा समन्वयक प्रदीपजी बोरकर ,आमदार वैभव नाईक, जिल्हाप्रमुख संदेश पारकर, कणकवली विधानसभाप्रमुख सतीश सावंत, विधानसभा संपर्कप्रमुख अतुल रावराणे, युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक, महिला जिल्हाप्रमुख नीलम पालव, उपजिल्हाप्रमुख राजू शेट्ये,सचिन सावंत हे उपस्थित राहणार आहेत.
तरी सर्व शिवसेना, युवासेना, महिला आघाडीच्या पदाधिकारी,आजी माजी लोकप्रतिनिधी, व शिवसैनिक यांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन जिल्हाप्रमुख संदेश पारकर , तालुकाप्रमुख शैलेश भोगले, प्रथमेश सावंत, शहरप्रमुख प्रमोद मसुरकर,उमेश वाळके, राजू राठोड, उत्तम लोके, वैदेही गुडेकर यांनी केले आहे.
