तळेरे येथील नारायणी रावराणे नवोदय विद्यालय प्रवेशास पात्र

⚡कणकवली ता.०४-: आयडियल इंग्लिश स्कूल ॲण्ड ज्युनिअर कॉलेज ऑफ काॅमर्स ॲण्ड सायन्स, वरवडे विद्यालयातील कु. नारायणी गणेश रावराणे हिची महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे -पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेत (पाचवी- इंग्रजी माध्यम) जिल्हा गुणवत्ता यादीत निवड झालेली आहे.
नारायणी ही नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षेत (इंग्रजी माध्यम) -29  एप्रिल 2023- दुसऱ्या निवड यादीमधून प्रवेशासाठी पात्र ठरली आहे. तिच्या या सुयशासाठी तिचे तळेरे पंचक्रोशीत सर्वत्र अभिनंदनपर कौतुक होत आहे.

    वाचन, चित्रकला, बागकाम, बुद्धिबळ, व्हाॅलिबाॅल हे नारायणीचे छंद आहेत. गणित, विज्ञान, इंग्रजी हे तिचे आवडीचे विषय आहेत. द विजिष अकॅडमी, वैभववाडी’ च्या संचालिका- शितल राजेंद्र पाटील,आयडियल इंग्लिश स्कूल, वरवडेचे शिक्षक आणि नारायणीची आई पूजा व वडील गणेश रावराणे यांचे नारायणीला अनमोल मार्गदर्शन लाभले आहे.

You cannot copy content of this page