युवराज लखम राजेंनी मृत दोन्ही युवकांच्या कुटुंबांना प्रत्येकी पंचवीस लाख मिळवून द्यावे

जयेंद्र परुळेकर:अन्यथा आमदारकीचे स्वप्न पाहणाऱ्या राजांचे डिपॉझिट जनता जप्त करेल..

सावंतवाडी ता.०४-:येथील नगरपालिकेने राजवाड्याला भेडले माडाचे झाड तोडण्या संदर्भात नोटीस बजावूनही ते झाड न तोडल्याने दोन युवकांचा जीव गमवावा लागला आहे याला पूर्णपणे युवा मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष युवराज लखमराजे भोसले जबाबदार आहेत त्यांनी तात्काळ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यामार्फत दोघांच्याही कुटुंबांना प्रत्येकी 25 लाख रुपये मिळवून द्यावे अन्यथा आमदारकीचे स्वप्न पाहणाऱ्या राजेंचे डिपॉझिट येथील जनता जप्त करेल असा आरोप ठाकरे सेनेचे प्रवक्ते डाॅ.जयेंद्र परुळेकर यांनी केला

You cannot copy content of this page