कणकवली ग्रामसेवक युनियनच्या अध्यक्षपदी वैभव धुमाळे तर सचिवपदी वैभव ठाकूर…

⚡कणकवली ता.०४-: महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक युनियन डी.एन.ई. 136 संघटनेच्या शाखा कणकवलीची कार्यकारिणी बिनविरोध निवड करण्यात आली.अध्यक्षपदी वैभव धुमाळे तर सचिवपदी वैभव ठाकूर
यांची निवड करण्यात आली आहे.

उपाध्यक्षपदी श्री.शशिकांत तांबे,महिला उपाध्यक्ष श्रीम.अर्चना लाड, सचिव श्री.वैभव ठाकूर,कोषाध्यक्ष श्री.संजय कवटकर, सहसचिव श्री.नितीन भाट, संघटक सिद्धेश गोसावी, श्रीम.तृप्ती पेडणेकर ,श्री.विशाल वरवडेकर अशी नूतन कार्यकारिणीची निवड झाली.

यावेळी माजी अध्यक्ष आणि सचिव राजेंद्र सावंत,दीपक तेंडुलकर यांच्या उत्कृष्ट कामासाठी सत्कार करण्यात आला. तसेच नूतन कार्यकारिणीचा सत्कार कणकवली गटविकास अधिकारी अरुण चव्हाण विस्तार अधिकारी सूर्यकांत वारंग तसेच इतर मान्यवर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

You cannot copy content of this page