कणकवली पत्रकार समिती अध्यक्षपदी चंद्रशेखर देसाई बिनविरोध….

*💫कणकवली दि.९-:* कणकवली तालुका पत्रकार समिती नुतन कार्यकारिणी निवडीसाठीची सभा येथील मातोश्री मंगल कार्यालयात मंगळवारी पार पडली. सभेत अध्यक्षपदी दै. ‘तरूण भारत’चे कणकवली तालुकाप्रमुख चंद्रशेखर दसाई यांची बिनविरोध निवड करण्यात आली. सचिवपदी संजय राणे तर खजिनदारपदी नितीन कदम यांची निवड करण्यात आली. उर्वरित कार्यकारिणी : उपाध्यक्ष – विशाल रेवडेकर व उत्तम सावंत, सहसचिव – मिलिंद डोंगरे, कार्यकारिणी सदस्य – सौ. रंजिता तहसीलदार, विनोद जाधव, गुरुदास सावंत, रमेश जामसंडेकर, तुळशीदास कुडतरकर यांची निवड करण्यात आली. निवडणूक निरीक्षक म्हणून जिल्हा पत्रकार संघाचे उपाध्यक्ष उज्ज्वल नारकर व जिल्हा कार्यकारिणी सदस्य एकनाथ पवार यांनी काम पाहिले. बैठक कणकवली पत्रकार समितीचे मावळते अध्यक्ष भगवान लोके यांच्या अध्यक्षतेखाल पार पडली. याप्रसंगी जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष गणेश जेठे, जिल्हा उपाध्यक्ष रमेश जोगळे, जिल्हा कार्यकारिणी सदस्य सुधीर राणे, माजी जिल्हाध्यक्ष माधवराव कदम, संतोष वायंगणकर आदी उपस्थित होते. प्रास्ताविकात माजी अध्यक्ष भगवान लोके यांनी गेल्या अडिच वर्षांत केलेल्या कामाचा लेखाजोखा मांडला. त्यानंतर निरिक्षक एकनाथ पवार, उज्ज्वल नारकर यांनी नियुक्ती प्रक्रियेला सुरुवात केली. यावेळी अध्यक्षपदासाठी चंद्रशेखर देसाई यांचे एकमेव नाव पुढे आल्याने त्यांची रितसर अध्यक्षपदी नियुक्ती जाहिर करण्यात आली. तर उर्वरित कार्यकारिणीही बिनविरोध जाहिर करण्यात आली. निरीक्षक पवार, नारकर यांनीही कार्यकारिणी निवड बिनविरोध झाल्याबाबत पत्रकार समितीच्या एकीचे कौतुक केले. तर गणेश जेठे, रमेश जोगळे, भगवान लोके आदींनीही नुतन कार्यकारिणीला शुभेच्छा दिल्या. नुतन अध्यक्ष चंद्रशेखर देसाई म्हणाले, आपण सर्वांनी टाकलेला विश्वास सार्थकी लावीन. येत्या काळात पत्रकार व त्यांच्या कुटुंबियांसाठी हेल्थ इन्शुरन्स मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील राहणार आहे. सर्वांना एकत्र घेऊन कार्यरत राहणार असून पत्रकारांच्या हितासाठी जास्तीतजास्त उपक्रम राबविणार असल्याची ग्वाही देसाई यांनी दिली. याप्रसंगी पत्रकार समितीच्या मावळत्या कार्यकारिणीतील सचिव नितीन सावंत, खजिनदार माणिक सावंत, सहसचिव संतोष पाटणकर, जिल्हा पत्रकार संघाचे माजी सचिव चंद्रशेखर तांबट, माजी तालुकाध्यक्ष लक्ष्मीकांत भावे, अजित सावंत, संतोष राऊळ, ज्येष्ठ पत्रकार अशोक करंबेळकर, भाई चव्हाण, दिलीप हिंदळेकर, तुषार सावंत,अनिकेत उचले आदींसह तालुक्यातील पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते.

You cannot copy content of this page