“सावंतवाडी उपजिल्हा रूग्णालय बांधकाम दुरुस्ती प्रश्नी तालुका राष्ट्रवादी आक्रमक”…

‘वैद्यकिय अधिकाऱ्यांना धरले धारेवर’

*💫सावंतवाडी दि.०९:-* दिवसेंदिवस रूग्णांची होणारी परवड आणि रुग्णालयाची दुरावस्था या प्रश्नी अखेर आज राष्ट्रवादी काँग्रेसने लक्ष घातले.मान.जिल्हाध्यक्ष अमित सावंत, तालुकाध्यक्ष पुंडलीक दळवी,युवक राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष प्रफुल्ल सुद्रिक यांच्या मार्गदर्शनाखाली,युवक राष्ट्रवादी अध्यक्ष राजु धारपवार यांच्यासह असंख्य कार्यकर्त्यांनी आज थेट रुग्णालयात धडक देत,उपजिल्हा रूग्णालय अधिक्षक उत्तम पाटिल यांना धारेवर पकडले. सदर रूग्णालयाच्या जिन्याच्या साईडपट्टीचे काम अद्यावत पुर्ण न झाल्याने जीवितहानी होण्याचा संभव आहे.तरी या संदर्भात कार्यकारी अभियंता, सार्वजनिक विभाग यांजकडे आपण लेखी तक्रार दिली असल्याचे वैद्यकीय अधिक्षक पाटिल यांनी सांगितले. तरी सदर घटनेत योग्य ती चौकशी करुन कामास सुरुवात न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा राष्ट्रवादी युवक तालुकाध्यक्ष राजु धारपवार यांनी दिला आहे. तरी याप्रसंगी राष्ट्रवादी युवक तालुकाध्यक्ष राजु धारपवार,राष्ट्रवादी विद्यार्थी तालुकाध्यक्ष प्रतीक नाईक, ,राष्ट्रवादी विद्यार्थी शहराध्यक्ष अभिजीत पवार,परेश तांबोसकर,संजय सुर्वे, असीम वागळे आदी उपस्थित होते.

You cannot copy content of this page