सार्वजनिक नवरात्र उत्सव कट्टा कॉर्नर बांदाच्या अध्यक्षपदी संजय नाईक…

उपाध्यक्षपदी आपा चिंदरकर;नवीन पदाधिकारी निवडीसाठी बैठक संपन्न..

⚡बांदा ता.०२-: सार्वजनिक नवरात्र उत्सव कट्टा कॉर्नर बांदाच्या अध्यक्षपदी संजय नाईक, उपाध्यक्षपदी आपा चिंदरकर यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.

सचिवपदी प्रवीण शिरसाट, खजिनदारपदी सलील वळंजू तर सहखजिनदारपदी सिद्धेश वेंगुर्लेकर यांची निवड करण्यात आली.

नवीन पदाधिकारी निवडीसाठी बैठक संपन्न झाली. यामध्ये नवरात्रोत्सवात ९ दिवस होणाऱ्या विविध सांस्कृतिक कार्यक्रमांची रूपरेषा ठरविण्यात आली. नूतन पदाधिकाऱ्यांचे यावेळी माजी अध्यक्ष अशोक सावंत व राजू वाळके यांनी पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले. यावेळी नाना शिरोडकर, विशांत पांगम, अभय नाईक, आबा सावंत, विकी कदम, समीर सातार्डेकर, केदार कणबर्गी, प्रसाद गायतोंडे, प्रमोद कळंगुटकर, मंगेश बांदेकर, भाऊ वाळके, नागेश बांदेकर, सच्चीदानंद मांजरेकर, प्रवीण गाड, बाळा आकेरकर, संजय शिरोडकर, अनंत आईर, निनाद पित्रे आदी उपस्थित होते.

You cannot copy content of this page