वेंगुर्ला पोलिस ठाणे येथे उद्या श्रीसत्यनारायण महापूजा व दशावतारी नाट्यप्रयोगाचे आयोजन…

⚡वेंगुर्ला ता.०२-: वेंगुर्ला पोलिस ठाणे येथे दरवर्षीप्रमाणे यंदाही गणपतीचे उत्साहात पूजन करण्यात आले आहे. यानिमित्त रोज याठिकाणी संगीत व वारकरी भजने संपन्न होत आहेत. या गणपतीचे १७ दिवसांनी गुरूवारी सायंकाळी मांडवी खाडी येथे विसर्जन होणार आहे.
दरम्यान, मंगळवार दि.३ ऑक्टोबर रोजी याठिकाणी श्रीसत्यनारायण महापूजेचे आयोजन केले आहे.

त्यानतर रात्रौ ७ वाजता दत्तमाऊली दशावतार नाट्य मंडळाचा दणदणीत दशावतार नाट्यप्रयोग होणार आहे. तीर्थप्रसादाचा लाभ घ्यावा तसेच नाट्यप्रयोगालाही उपस्थित रहावे असे आवाहन वेंगुर्ला पोलिस ठाणेच्यावतीने पोलिस निरीक्षक अतुल जाधव यांनी केले आहे.

You cannot copy content of this page