सावंतवाडी उभा बाजार हनुमान मित्र मंडळाच्या बाप्पाला संकष्टी चतुर्थी निमित्त सहस्र मोदकांचा नैवेद्य…

सावंतवाडी ता.०२-: येथील उभाबाजार हनुमान मित्र मंडळाच्या वतीने या ठिकाणी प्रतिष्ठापना करण्यात आलेल्या गणपती बाप्पाला आज संकष्टी चतुर्थी निमित्त सहस्र मोदकांचा नैवेद्य अर्पण करण्यात आला.यावेळी उभाबाजार मित्र मंडळातील महिलांसह मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.

प्रतिवर्षीप्रमाणे यावर्षीही श्री हनुमान मंदिरात 21 दिवसांच्या गणपती बाप्पाची प्रतिष्ठापना करण्यात आली आहे बाप्पांच्या दर्शनाला या ठिकाणी दिवसेंदिवस नागरिकांची मोठी गर्दी होत आहे दरम्यान आज संकष्टी चतुर्थी निमित्त गणपती बाप्पाचे दर्शन घेण्यासाठी मोठ्या संख्येने नागरिक भक्ती सागर या ठिकाणी लोटला आहे.

You cannot copy content of this page