Headlines

अखेर भाजी मंडईतील व्यापाऱ्यांनी शब्द पाळला…

दुकानांचे केले स्थलांतर; नव्या काॅम्प्लेक्स उभारणीचा मार्ग मोकळा..

⚡सावंतवाडी ता.३०-: येथील संत गाडगेबाबा भाजी मंडईतील व्यापाऱ्यांनी आज अखेर दिलेल्या शब्दाप्रमाणे दुकानाचे स्थलांतर दिलेल्या जागेत केले. गणेश चतुर्थीपर्यत स्थलांतर नको अशी मागणी व्यापाऱ्यांनी प्रशासनाकडे केली होती. माजी नगराध्यक्ष संजू परब यांनीही याबाबत व्यापाऱ्यांची बाजू प्रशासनाने मांडली होती.

त्यानुसार प्रशासनाकडून मागणी मान्य करण्यात आली होती. अखेर आज सर्व व्यापाऱ्यांकडून आपली दुकाने स्वत: दुसरीकडे दिलेल्या जागेत स्थलांतर करत शब्द पाडल्याने आता नव्याने उभारण्यात येणाऱ्या काॅम्प्लेक्सचा मार्ग मोकळा झाला आहे.

You cannot copy content of this page