पालकमंत्री रवींद्र चव्हाण करणार शुभारंभ
ओरोस ता २९
शिव राज्याभिषेकाचे 350 वे वर्ष आणि विश्व हिंदू परिषदेचे हिरक महोत्सवी वर्ष या औचित्यावर विश्व हिंदु परिषद आणि बजरंग दल, कोकण प्रांत आयोजीत ‘शिवशौर्य यात्रेचा’ शुभारंभ सिंधुदुर्ग जिल्ह्यात दोडामार्ग येथे शनिवार ३० सप्टेंबर २०२३ रोजी सकाळी ठीक 8 वा. होत आहे. अशा यात्रा संपूर्ण देशभर संपन्न होणार आहेत.
या देशव्यापी ‘शौर्य जागरण’ यात्रे मध्ये सहभागी होण्यासाठी जिल्हयाचे पालकमंत्री रविंद्र चव्हाण स्वतः हजर राहून सहभागी होत आहेत. सोबतच प्रदेश उपाध्यक्ष अतुल काळसेकर, प्रमोद जठार, जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, आ.नितेश राणे, निलेश राणे, राजन तेली आणि सर्वच भाजपा पदाधिकारी तसेच कार्यकर्ते सहभागी होणार आहेत.
आपण सर्व हिंदू प्रेमी नागरिक,भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते हिंदू धर्मविरोधी कारवायांच्या विरोधात समाजाला जागृत करण्यासाठी ‘शौर्य जागरण’ यात्रे मध्ये सहभागी होऊ. सर्वानी या यात्रेत मोठ्या संख्येने उपस्थित राहावे व यात्रेचे मनोभावे स्वागत करावे असे आवाहन भाजपा जिल्हा कार्यालयाकडून करण्यात आले आहे.
यात्रेचा प्रवास
शनिवार ३० सप्टेंबर २०२३ रोजी दोडामार्ग सकाळी ८.०० वा सुरू, बांदा सकाळी ११ वा दर्शन थांबा. सावंतवाडी दुपारी १२ ते २ दर्शन थांबा. कुडाळ दुपारी २.३० ते सायं ४.००वा. मालवण सायं ५ वा कुंभारमाठ येथे आगमन तर मामा वरेरकर नाट्यगृह येथे सायं ७ वा.जाहीर सभा होणार आहे. रविवार १ ऑक्टोबर २०२३ रोजी कणकवली सकाळी १० वा. दर्शन थांबा. नांदगाव दुपारी १२.३० वा.दर्शन थांबा. कासार्डे दुपारी १.१० वा. स्वागत थांबा. तळेरे दुपारी २.३० वा. स्वागत थांबा. खारेपाटण दुपारी ३.३० वाजता दक्षिण रत्नागिरी कडे यात्रा प्रस्थान. यानंतर ही यात्रा दिनांक 15 ऑक्टोबर पर्यंत कोकण प्रांताचा प्रवास पूर्ण करणार आहे.
