बांदा पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक प्रवीण माने यांचे हृदयविकाराचा झटक्याने निधन…

⚡बांदा ता.२३-:
बांदा पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले पोलीस उपनिरीक्षक प्रवीण सीताराम माने यांचे हृदयविकाराचा तीव्र झटका आल्याने निधन झाले.

माने हे मुळ महाड येथील असून सध्या सावंतवाडी येथे राहत होते. ते बांदा पोलीस ठाण्यात सुरुवातीला जमादार होते. कठोर मेहनतीच्या जोरावर त्यांनी खात्यातर्गत परीक्षा उत्तीर्ण होत ते पोलीस उपनिरीक्षक झाले होते. त्यांना प्रशासकीय बाबींची उत्तम जाण होती. त्यांनी अनेक गुन्ह्यात निर्णायक भूमिका बजावली होती. त्यांच्या अचानक निधनाने पोलीस कर्मचाऱ्यात शोककळा पसरली आहे.

You cannot copy content of this page