Headlines

बांद्यात महिलांसाठी मोफत आरी वर्क, फ्लॉवर मेकिंग प्रशिक्षण…

⚡बांदा ता.२७-: बांदा ग्रामपंचायतीच्या वतीने गावातील महिलांना स्वावलंबी बनविण्याच्या उद्देशाने मोफत आरी वर्क व फ्लॉवर मेकिंग या व्यावसायिक प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले आहे. हे प्रशिक्षण ३० सप्टेंबर ते ७ ऑक्टोबर या कालावधीत बांदा ग्रामपंचायत कार्यालयात होणार आहे.
दररोज दुपारी २ ते ५ या वेळेत प्रशिक्षण दिले जाणार असून, आरी वर्क आणि आकर्षक फुलांची सजावट व निर्मिती याबाबत महिलांना मार्गदर्शन करण्यात येणार आहे. प्रशिक्षण पूर्ण करणाऱ्या सहभागी महिलांना प्रशिक्षणाचे प्रमाणपत्र देण्यात येणार आहे.
बांदा गावातील जास्तीत जास्त महिलांनी या प्रशिक्षणाचा लाभ घ्यावा, असे आवाहन ग्रामपंचायतीच्या वतीने करण्यात आले आहे. प्रशिक्षणासाठी नावनोंदणी अद्याप न केलेल्या महिलांनी प्रशिक्षणाच्या पहिल्या दिवशी उपस्थित राहावे. प्रथम येणाऱ्या महिलांना प्राधान्य देण्यात येणार आहे.
प्रशिक्षणासाठी सहभागी महिलांनी आधारकार्ड व दोन फोटो आणणे आवश्यक आहे. नावनोंदणी व अधिक माहितीसाठी ९९६७३११७०५ या क्रमांकावर संपर्क साधावा.

You cannot copy content of this page