Headlines

बाजारपेठ नवरात्रोत्सव मंडळाच्या अध्यक्षपदी सत्यवान बांदेकर…

⚡सावंतवाडी ता.२७-: येथील बाजारपेठ नवरात्रोत्सव मंडळाच्या अध्यक्षपदी यावर्षी सत्यवान बांदेकर यांची निवड करण्यात आली आहे. तर खजिनदारपदी शैलेश मित्र आणि सचिवपदी दीपक केसरकर यांची नियुक्ती करण्यात आली.

याबाबत मंडळाची बैठक आज पार पडली. या बैठकीत मंडळाच्या आगामी नवरात्रोत्सवाच्या अनुषंगाने पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या. नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे उपस्थित सदस्यांनी अभिनंदन करून त्यांना शुभेच्छा दिल्या.
नवरात्रोत्सव उत्साहात आणि शिस्तबद्ध पद्धतीने पार पाडण्यासाठी मंडळाच्या वतीने विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात येणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

You cannot copy content of this page