Headlines

पाळणेकोंड धरणाचे पाणी सोडल्याने सावंतवाडीकरांसमोर पाणीटंचाईचे संकट

पाण्याची पातळी ८ ते १० फूट खाली; उन्हाळ्यात सावंतवाडीकरांचे हाल होण्याची शक्यता: संजू परब यांचा आरोप..

⚡सावंतवाडी ता २७-: कुणकेरी येथील पाळणेकोंड धरणातील पाणी सावंतवाडी नगर परिषदेने सोडल्यामुळे सावंतवाडीकरांसमोर पाणीटंचाईचे संकट असल्याचा आरोप शिवसेना जिल्हाप्रमुख तथा नगरसेवक संजू परब यांनी केला आहे. दरम्यान धरणातील पाण्याची पातळी सुमारे ८ ते १० फूटांनी खाली गेल्याचे चित्र आहे. आगामी काळात पावसाची शक्यता कमी असल्याने उपलब्ध पाणीसाठ्याचे नियोजन न केल्यास उन्हाळ्यात सावंतवाडी शहराला तीव्र पाणीटंचाईला सामोरे जावे लागू शकते, अशी चिंता व्यक्त होत आहे. त्यामुळे धरणातील पाणीसाठा जपण्याबरोबरच भविष्यातील पाणीपुरवठ्याचे योग्य नियोजन करण्याची गरज निर्माण झाली आहे

परब पुढे म्हणाले की,सावंतवाडी नगर परिषद प्रशासनावर कोणाचाही वचक राहिलेला नाही, अशी टीका नागरिकांमधून होत आहे. प्रशासनाच्या कामकाजावर सत्ताधाऱ्यांचे अपेक्षित नियंत्रण नसल्याने शहराच्या मूलभूत प्रश्नांकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोपही केला जात आहे. नगरपालिका प्रभावीपणे चालविण्याबाबत सत्ताधाऱ्यांना स्वारस्य नसल्याचे चित्र निर्माण झाले असून, पाणीपुरवठ्यासारख्या महत्त्वाच्या विषयावर तातडीने उपाययोजना न झाल्यास त्याचा फटका आगामी उन्हाळ्यात सावंतवाडीकरांना बसण्याची शक्यता आहे.

You cannot copy content of this page