कार्यकर्त्यांकडून तेलींचा वाढदिवस साजरा
⚡सावंतवाडी ता.२३-: येथील भाजपचे युवा नेते तथा प्रदेश उपाध्यक्ष प्रथमेश तेली सध्या सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात ठिक ठिकाणी कार्यकर्त्यांच्या घरी गणरायाचे दर्शन घेत आहेत. दरम्यान काल त्यांचा वाढदिवस देखील योगायोगाने आल्याने कार्यकर्त्यांनी त्यांचा वाढदिवस देखील उत्सवात साजरा केला.
दरम्यान प्रथमेश तेली यांची नुकतीच प्रदेश उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. त्यानंतर त्यांनी संघटना बांधणी वर भर दिला असून भाजपचे योजना तळागाळापर्यंत पोहोचवण्याचे ते प्रामाणिक प्रयत्न करत आहेत. दरम्यान गणेश चतुर्थी असल्याने श्री प्रथमेश तेली हे सध्या सावंतवाडी मतदारसंघात विविध पदाधिकाऱ्यांच्या घरी गणरायाचे दर्शन घेतले. यावेळी त्यांचा काल वाढदिवस तब्बल 12 ठिकाणी साजरा करण्यात आला.
