तळगाव येथील रामेश्वर विद्यालयात स्नेहमेळावा संपन्न…

⚡मालवण ता.२३-: तळगाव येथील श्री रामेश्वर माध्यमिक विद्यालय येथे तळगाव हितवर्धक संघ, मुंबईचे पदाधिकारी, सभासद, ग्रामस्थ व नोकरी, व्यवसायानिमित्त अन्य शहरांत स्थिर झालेले आणि गणेशोत्सवासाठी गावी आलेले तळगाववासी, चाकरमानी रामेश्वर माध्यमिक विद्यालयाचे आजी-माजी विद्यार्थी, पालक, आजी-माजी शिक्षक, कर्मचारी, शालेय समिती सदस्यांचा स्नेहमेळावा उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.

कार्यक्रमाला संस्थेचे अध्यक्ष आनंद दळवी, सचिव अनिल दळवी, सल्लागार लहू राणे व जी. आर. दळवी, सहसचिव गोविंद उर्फ राजा दळवी, जनार्दन उर्फ अमोल दळवी, सर्व कार्यकारी समिती सदस्य, विद्यालयाच्या मुख्याध्यापिका शैलजा शिरोडकर, शालेय समिती अध्यक्ष उत्तम दळवी, माजी मुख्याध्यापक व सल्लागार प्रदीप शिंदे, शालेय समिती सदस्य, सरपंच लता खोत आदी उपस्थित होते.

यावेळी संस्थेतर्फे विद्यालयातील गुणवंत विद्यार्थी, शिष्यवृत्ती देणाऱ्या देणगीदार यांचा सन्मानचिन्ह, पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला. तळगाव हितवर्धक संघ, मुंबईचे संस्थापक कै. एल. डी. दळवी यांना मरणोत्तर तळगावरत्न भूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला. पुरस्कार कै. दळवी यांचे चिरंजीव प्रकाश उर्फ पापा दळवी यांनी स्वीकारला. प्रकाश दळवी यांनी मनोगतात सर्वांचे आभार मानले.

कार्यक्रमाची संकल्पना संस्थेचे सहसचिव गोविंद उर्फ राजा दळवी यांची होती. कार्यक्रमाचे नियोजन मुख्याध्यापिका शैलजा शिरोडकर यांनी सहकारी शिक्षक, कर्मचारी व शालेय समिती सदस्यांच्या सहकार्याने यशस्वीरित्या केले. सूत्रसंचालन पंडित माने यांनी केले. शिक्षिका सावंत आणि शिक्षक जैतापकर यांचे सहकार्य. लाभले. संस्थेचे सहसचिव जनार्दन उर्फ अमोल दळवी यांनी आभार मानले.

You cannot copy content of this page