प्रमोद कंडरकर:आंदोलन छेडण्याचा दिला इशारा…
⚡मालवण ता.२३-: मालवण तालुक्यातील संजय गांधी निराधार योजनेच्या ३८८६ पेन्शनधारकांच्या खाती शासनाकडून दार महिन्याला निश्चित केलेली रक्कम जमा होते. मात्र, जुलै, ऑगस्ट महिन्यांची पेन्शन अद्याप शासनाकडून जमा न झाल्याने गणेश चतुर्थीच्या सणाला निराधारांना आधारच नसल्याचे चित्र तालुक्यात निर्माण झाल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस प्रमोद कांडरकर प्रमोद कांडरकर यांनी करीत याबाबत आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे.
शासनाकडून पेन्शनधारकांना गणपती उत्सवात रक्कम खात्यावर जमा करणे आवश्यक होते. जिल्हा प्रशासनाने याबाबत शासनाकडे मागणी केली होती. तरीही शासनाने याकडे दुर्लक्ष केले आहे. तीन व्यक्तींचे सरकार राज्यात असल्याने कोणालाच कोणाचा मेळ नसल्याची परिस्थिती आहे. दर महिन्याला पेन्शनधारक मोठ्या आशेने येणाऱ्या पैशांकडे वाट बघत असतात, मात्र गेले दोन महिने ही रक्कमच आली नसल्याने पेन्शनधारकांचे हाल होत आहेत. शासनाने येत्या आठ दिवसात ही रक्कम जमा न केल्यास राष्ट्रवादी काँग्रेसकडून आंदोलन छेडण्यात येणार आहे, असेही प्रमोद कांडरकर यांनी स्पष्ट केले आहे.
संजय गांधी निराधार योजनेमध्ये बहुतांश प्रमाणात दिव्यांग व्यक्तींचा समावेश आहे. दिव्यांग व्यक्तींना शासनाने यातून उघड्यावर आणले आहे. काही दिव्यांग, तर दुसऱ्यांवर अवलंबून आहेत. अशावेळी त्यांना आर्थिक मदत करणे आवश्यक आहे. शासनानेच जर त्यांचे मानधन दिले नाही, तर दिव्यांगांनी पाहायचे कोणाकडे, असा प्रश्न निर्माण झाला आहे, असेही कांडरकर यांनी म्हटले आहे.
