उदय सामंत:पण ते सहा ते सात पदाधिकाऱ्यांच्या घरी गेल्याच लगावला खोचक टोला…
⚡वेंगुर्ले ता.२२-: गणेश चतुर्थी निमित्त तरी आदित्य ठाकरे हे सिंधुदुर्ग जिल्ह्यात पदाधिकाऱ्यांच्या घरी आले याचा मला आनंद आहे. त्यामुळे त्यांना इतक्या वर्षा नंतर सिंधुदुर्गातील गणेश उत्सव बघण्याचा त्यांना योग आला आहे, अशी टिका राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी आज येथे केली.दरम्यान आदित्य ठाकरे हे 15 ते 20 पदाधिकाऱ्यांच्या घरी जाणार होते. परंतु ते सहा सात पदाधिकाऱ्यांच्याच घरी गेले. हे पण काय कमी नाही, असा टोला देखील त्यांनी यावेळी लगावला. मंत्री सामंत आज आपल्या वेंगुर्ल्यातील निवासस्थानी आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.
यावेळी सामंत पुढे बोलताना म्हणाले की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ज्याप्रकारे आज राज्यात वातावर निर्माण केले. ते पाहता ते कुठल्याही 288 मतदारसंघात उभे राहिले तरी ते मोठ्या मताधिक्याने निवडून येऊ शकतात, अशा प्रकारचे राज्यात आज चित्र आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे यांच्यावर टीका करण्यापेक्षा आदित्य ठाकरे यांनी स्वतःच्या मतदारसंघ लक्ष द्यावे अशी टिका देखील त्यांनी यावेळी केली.
