वैभववाडी येथे राष्ट्रीय काँग्रेसच्यावतीने तालुकास्तरीय गणेश सजावट स्पर्धा

वैभववाडी प्रतिनिधी
सिंधुदुर्ग जिल्हा राष्ट्रीय काँग्रेस कमिटी आयोजित सन 2023 तालुकास्तरीय गणपती आरास सजावट स्पर्धा गुरुवार दिनांक 21 सप्टेंबर ते सोमवार 25 सप्टेंबर 2023 कालावधीमध्ये आयोजित करण्यात आलेले आहेत.

या स्पर्धेसाठी गणेश भक्तांनी आपल्या कुटुंबासोबत गणपती सजावटीचा एक मिनिटाचा व्हिडिओ सोबत स्वतःचे नाव गावचे नाव व मोबाईल क्रमांक सहित माहिती 9404743605/8808768570 या नंबर वर पाठवावी यासाठी प्रथम पारितोषिक 11111, द्वितीय पारितोषिक 7777 तर तृतीय पारितोषिक 5555 तर उत्तेजनार्थ दोन पारितोषिक 1111 व प्रमाणपत्र देण्यात येणार आहे तरी या स्पर्धेसाठी तालुक्यातील गणेश भक्तांनी मोठा सहभाग घ्यावा अशी आव्हान वैभववाडी तालुका अध्यक्ष दादामिया पाटणकर, जिल्हा सचिव माजी सभापती मीनाताई बोडके यांनी केले आहे.

You cannot copy content of this page