मोदी यांच्या ऐतिहासिक निर्णयाने महिलांना सर्वोच्च संसद भवनात नेतृत्व करण्याची संधी…

श्वेता कोरगावकर: मोदींनी आणलेले विधेयक हे मोठे क्रांतिकारक पाऊल…

⚡बांदा ता.२०-: भारतीय संसदेच्या विशेष अधिवेशनात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘नारी शक्ती वंदन अधिनियम’ या नावाने महिला आरक्षणाचे विधेयक मांडले. तसेच महिलांसाठी लोकसभा आणि विधानसभेत ३३ टक्के आरक्षणाच्या विधेयकाची घोषणा केली. पंतप्रधान मोदी यांच्या या ऐतिहासिक निर्णयाने महिलांना देशाच्या व राज्याच्या सर्वोच्च संसद भवनात नेतृत्व करण्याची संधी उपलब्ध झाली आहे. या निर्णयाचे महिला वर्गातून स्वागत होत असून पंतप्रधान मोदी यांनी महिलांना योग्य सन्मान दिल्याची प्रतिक्रिया भाजपच्या सिंधुदुर्ग जिल्हा महिला मोर्चाच्या अध्यक्षा सौ. श्वेता कोरगावकर यांनी दिली आहे.

लोकशाहीत महिलांचा सहभाग जास्तीत जास्त वाढविण्याच्या हेतूने श्री मोदींनी आणलेले विधेयक हे मोठे क्रांतिकारक पाऊल आहे. स्त्री आणि पुरुष यांची समानता ही नक्कीच या निर्णयातून जपली जाईल याची आपल्याला खात्री आहे. नवीन संसद भवनात सादर झालेले पहिले विधेयक हे प्रत्येक महिलेसाठी अभिमानास्पद असल्याचे कोरगावकर म्हणाल्या

You cannot copy content of this page