मंत्री केसरकर यांचा पुढाकार: गणेश भक्तांना गणरायाला निरोप देताना सुखकर होणार..
⚡सावंतवाडी ता.२०-: शहरातील गणरायांचे विसर्जन ऐतिहासिक मोती तलावात केले जाते. यावेळी गणेश भक्तांना कोणतीही उणीव भासू नये. कोणताही अनुचित प्रकार घडू नये. तसेच आपल्या लाडक्या गणरायाला उत्साहात निरोप देता यावा यासाठी या विसर्जन स्थळी शिंदे शिवसेनेकडून शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांच्या माध्यमातून जय्यत तयारी सुरू करण्यात आली आहे. यामुळे गणेश भक्तांना गणरायाला निरोप देताना सुखकर होणार आहे.
दरम्यान कोकणातील सर्वात मोठा उत्साहाचा आणि आनंदाचा उत्सव म्हणजे गणेशोत्सव. मंगळवारी जिल्ह्यात घरोघरी गणराया विधिवत पूजन करून विराजमान झाले आहे. विघ्नहर्त्याचे आगमन उत्साहात झाले आहे. मात्र, आजपासून गणेश विसर्जन सुरू होणार आहे. दीड दिवस, पाच दिवस, सात दिवस, नऊ दिवस, अनंत चतुर्थी आणि अकरा दिवस असे विसर्जन होणार आहे. बाप्पाला निरोप देत पुढच्या वर्षी लवकर या, असे सांगणे केले जाणार आहे.
