⚡कणकवली ता.१६-: हळवल येथील श्रीराम सेवा मंडळाकडून दहावी, बारावी पदवीधर व इतर परीक्षा उत्तीर्ण गुणवंत विद्यार्थ्यांचा कौतुक सोहळा करण्यात आला. यावेळी एकूण 35 विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला.
श्रीराम सेवा मंडळ कळवण मुंबई व स्थानिक श्रीराम सेवा मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने दरवर्षी हा गुणगौरव व कौतुक सोहळा आयोजित केला जातो. हा कार्यक्रम मुंबई मंडळाचे सचिव चंद्रकांत राणे यांच्या अध्यक्षतेखाली स्थानिक मंडळाचे अध्यक्ष तातू राणे व उपाध्यक्ष नारायण राणे, सामाजिक कार्यकर्ते भास्कर राणे, माजी सरपंच शशि राणे, ॲड. शंकर राणे, मुंबई मंडळाचे सदस्य चंद्रकांत बा. राणे, ज्येष्ठ वारकरी प्रभाकर राणे, ज्येष्ठ कीर्तनकार नामदेव राणे, तंटामुक्ती अध्यक्ष मारुती सावंत, गणेश राणे, रमेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यक्रम पार पडला.
यावेळी गुणवंत विद्यार्थ्यांना भेटवस्तू, सन्मानपत्र देऊन गुणगौरव करण्यात आला. यावेळी सामाजिक कार्यकर्ते भास्कर राणे यांनी मनोगतात गुणवंत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन शामसुंदर राणे यांनी तर शंकर राणे यांनी आभार मानले. हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी मयूर राणे, मंदार राणे, विक्रम राणे व दिनेश तावडे यांनी सहकार्य केले. आभार शंकर राणे यांनी मानले.
