पर्यटनाच्या संधीतून रोजगार उपलब्ध करणे गरजेचे

पालकमंत्री रवींद्र चव्हाण;केसरी येथील मत्स्यालयांचे दत्तात्रय चव्हाण यांच्याहस्ते उद्घाटन

⚡सावंतवाडी ता.११ प्रसन्न गोंदावळे-: सिंधुदुर्ग जिल्हा हा पर्यटन जिल्हा म्हणून परिचित आहे. त्यामुळे पर्यटकांना पर्यटनाची संधी उपलब्ध करून देणे हे अत्यंत गरजेचे असतं तसेच काही देश हे पर्यटनाच्या जीवावर चालतात त्यामुळे असे संधी जर आपण या जिल्ह्यात पर्यटकांना उपलब्ध करून दिल्या तर तरुणांना देखील एक रोजगाराची संधी उपलब्ध होईल असे प्रतिपादन सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी आज येथे केले.दरम्यान केसरी येते आज मत्स्यालयाचा शुभारंभ श्री. दत्तात्रय चव्हाण यांच्या हस्ते फित कापून करण्यात आले.यावेळी श्री. रवींद्र चव्हाण पत्रकारांशी बोलत होते.

यावेळी रवींद्र चव्हाण पुढे बोलताना म्हणाले की जिल्ह्यात प्रजात तयार झाल्या तर त्याचा देखील मार्केटिंग आपल्या सर्वांना करता येऊ शकते दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मत्स्य संपदा योजना ही जाहीर केली त्यात दहा हजार कोटी पेक्षा जास्त मत्स्य योजनेमध्ये देण्याचा ठरवलं होतं त्यामुळे अशा प्रकारचे रंगीत मासे त्याच्यामध्ये असणारे व्हरायटीज तयार करणे हा एक चांगला उद्योगाची संधी येणारा काळामध्ये उपलब्ध होऊ शकते असा विश्वास देखील त्यांनी यावेळी व्यक्त केला.

तसेच ते पुढे बोलताना म्हणाले की सिंधुदुर्ग मध्ये २०० ते ३०० रंगीत माशांचे काम करणारे मुले हे आजही सिंधुदुर्ग मध्ये आहेत परंतु त्या सर्वांना मार्केट उपलब्ध नाहीत, त्यामुळे एखादी जिल्ह्याची ओळख अशा पद्धतीने वरती यायला लागली तर इथे येऊन लोक त्याची खरेदी विक्री करू शकतात त्यामुळे हा वेगळ्या पद्धतीचे करण्याचा हा विचार आम्ही केलाय असे देखील श्री चव्हाण यावेळी बोलताना म्हणाले.

You cannot copy content of this page