मंत्री दीपक केसरकर:कळसुलकर हायस्कूल मध्ये केसरकर यांच्या उपस्थितीत आजी आजोबा दिवस साजरा..
⚡सावंतवाडी ता.११-: एकत्र कुटुंब पद्धती टिकून कुटुंबांमधील सदस्यांमध्ये संवाद साधला गेला पाहिजे .आपल्या कुटुंब पद्धतीत आजी आजोबा यांना महत्त्वाचे स्थान आहे .आजी आजोबांचे नाते अधिक वृद्धिंगत होण्यासाठी यंदापासून शाळांमध्ये आजी व आजोबा दिवस साजरा केला जात आहे त्यातून आपल्या समाजाला एक नवी दिशा प्रेरणा मिळेल असे प्रतिपादन शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी येथे केले.
सावंतवाडी एज्युकेशन संचलित कळसुलकर हायस्कूल मध्ये सोमवारी केसरकर यांच्या उपस्थितीत आजी आजोबा दिवस साजरा करण्यात आला.
यावेळी मुलांबरोबर त्यांचे आजी आजोबा शाळेत मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी व्यासपीठावर प्राथमिक शिक्षणाधिकारी प्रदीप कुडाळकर गटशिक्षणाधिकारी कल्पना बोडके केंद्रप्रमुख लक्ष्मीकांत ठाकूर संस्थेचे अध्यक्ष शैलेश पै माजी अध्यक्ष राजन पोकळे शिवसेना जिल्हा महिला आघाडी प्रमुख नीता सावंत मुख्याध्यापक एन.पी. मानकर संस्थेचे सचिव डॉ. प्रसाद नार्वेकर, मोहन वाडकर, शिवसेना शहरप्रमुख बाबू कुडतरकर नंदू गावडे ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष अण्णा देसाई तसेच संचालक शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते
दीपक केसरकर म्हणाले आजी-आजोबा दिवस शाळांमध्ये साजरा करण्याचा निर्णय शासनाने घेतला. यंदापासून अंमलबजावणी होत आहे .यामुळे आजी-आजोबा आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्यांचे नाते अधिक वृद्धिंगत होणार आहे
