युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांनी पक्ष वाढी संदर्भात केली चर्चा
⚡कणकवली ता.११-: युवा सेनेचे महाराष्ट्र राज्याचे सचिव वरून सरदेसाई यांचे सिंधुदुर्ग जिल्ह्यात आगमन झाल्यानंतर त्यांचे कणकवली विधानसभा युवा सेनेच्या वतीने युवा सेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांच्यासह युवा सैनिकांनी जल्लोषात स्वागत केले.
यावेळी खासदार विनायक राऊत यांच्यासह उपनेते अरुण दुधवडकर, युवतीसेना विस्तारक रुची राऊत, गीतेश राऊत, युवासेना कणकवली तालुका प्रमुख उत्तम लोके, युवासेना जिल्हा चिटणीस स्वप्निल धुरी, तालुका समन्व्यक तेजस राणे, उपजिल्हाप्रमुख मुकेश सावंत, अतुल सरवते, रोहित पावसकर, नितेश भोगले, धीरज मेस्त्री, संदीप गावकर, उद्धव पारकर, प्रसाद चव्हाण आदी उपस्थित होते.
